शेतकरी आंदोलन ३२९ व्या दिवशीही सुरूच! विविध संघटनेचा पाठिंबा

वर्धा : शहरातील बजाज चौकात सुरू असलेल्या शेतकरी कामगार धरने आंदोलनाला ७ नोव्हेंबर रोजी ३२९ व्या दिवशी विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व शैलेश सोनटक्के, विठ्ठल परतेकी, आनंदमणी डूकरे ,राजू तुरक, भास्कर भेदुरकर,विजय जंगळे या शेतक-यांनी सहभाग सामुहिकपणे केले.

तर आयटकचे राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हासहसचिव सुरेश गोसावी, कॉ. राजेश रामटेके, रामभाऊ दाभेकर, सामाजिक कार्यकर्ते बिल्सन मोखाडे, आचार्य कुलचे पदाधिकारी अवधेश, महाराष्ट्र अंधश्रध्दा निमूंलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, संघर्ष संघटनेचे गजानन पखाले, मुस्लिम मंचच्या परनिन शेख, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी संघटनेचे एस.एम.कांबळे ,यांनी आंदोलनास्थळी येवून पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here