जुन्या वादातून व्यक्‍तीस केली जबर मारहाण! पोलिसात तक्रार दाखल

हिंगणघाट : जुन्या वादातून व्यक्‍तीच्या डोक्यावर हातातील कड्याने जबर मारहाण करीत जखमी केले. वेळा गावात ही घटना घडली. रामभाऊ धोटे हा घरासमोर उभा असताना भोजराज शेंडे हा आला आणि जुन्या वादातून शिविगाळ करु लागला. रामभाऊने हटकले असता भोजराज शेंडे याने कड्याने रामरभाऊच्या डोक्यावर जबर मारहाण केली. यात रामभाऊ गंभीर जखमी झाला. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत असल्याची माहिती आहे. जुन्या वादातून हाणामारीच्या घटना वाढत चालल्या असून याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here