

उमरखेड : ऐन दिवाळीत सरकारने एसटी कामगारांची बोळवण केल्याने उमरखेड आगारासमोर एसटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले तिसऱ्या दिवशी आंदोलन सूरूच आहे. त्यामूळे प्रवाशांचे हाल होत आहे. कर्मचाऱ्यांना मान्य केलेल्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक प्रशासनाकडून होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचे जात आहे.
महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिल्या जात नाही कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत शासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०१९ पासून २८ टक्के महागाई भत्ता दिल्या जात असून रा.प. कर्मचाऱ्यांना फक्त १२ टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. अशा विविध समस्या घेऊन कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलावे काय असा प्रश्न एसटी कामगारांनी सरकारला केला आहे. कोरोना काळात कर्मचार्यांनी जिवाची पर्वा न करता अहोरात्र प्रवाशांची सेवा केल्यामुळे कोरोना चा संसर्ग होऊन ३०६ कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.
अशा कठीण परिस्थितीत रा प कामगार आपले काम प्रामाणिकपणे करीत आहे. असे असतानांही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एसटी कामगारांमध्ये फार मोठा असंतोष पाहायळा मिळत आहे. दिवाळीसारख्या सणात समोर आपले हक्काचे देयके कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने उपोषणा सारख्या निर्णय संयुक्त कृती समितीने घेतला कर्मचार्यांना दिवाळीचा तुटपुंजे भक्ता दिल्याने कर्मचाऱ्यांची सरकारने बोळवण केल्याचा आरोप एसटी कामगारांनी केला आहे.