
सिंदी (रेल्वे) : सिंदी- सेलडोह रस्त्यावर ड्रायपोर्टजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून छापा टाकला असता एका चारचाकी वाहनात 4 खरड्याच्या खोक्यात प्रति 48 नग 180 एम.एल. च्या देशी दारूने भरलेल्या सीलबंद 192 नग किंमत 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमालांसह आरोपीला रंगेहात अटक केली. गौरव रामहांस दोक्षित (वय 28) आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिल रोजी सिंदी-सेलडोह मार्गावरील ड्रायपोर्टजवळ नाकाबंदी करून छापा टाकला असता एम. एच 32 सी. 6011 या चारचाकी वाहनामध्ये 4 खोक्यामध्ये प्रति खोका 48 शिष्याप्रमाणे 180 एमएलच्या देशी दारूने भरून असलेला सीलबंद दारूसाठा 192 नग. एकूण 3 लाख 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी आरोपी गौरव दौक्षित याला पोलिसांनी अटक केली. पोलिस निरिक्षक वंदना सोनुने यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार प्रशांत श्रीवास्तव, आनंद भस्मे, धनराज सयाम, शीतल पु, संदेश सयाम, आकाश वालदे, खामनकर यांनी केली आहे.
















































