कारची दुचाकीला धडक! 1 गंभीर जखमी

सेलू : घोराड येथून सेलूला येत असलेल्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या कारने मागून जबर धडक दिली, या धडकेत दुचाकी चालक दूर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाला, ही घटना सेलू येथे पंचायत समितीजवळ सेलू-बोरधरण रस्त्यावर 26 एप्रिलला दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान घडली

घोराड येथून सेलूला येत असलेल्या MH 31, DE 6487 क्रमांकाच्या दुचाकी गाडीला हिंगणीकडून भरधाब MH 33 A 5199 क्रमांकाच्या मारुती कारने सेलू-बोरधरण रस्त्यावव पंचायत कार्यालयासमोर मागून धडक दिली, ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी व दुचाकीचालक हवेत फेकल्या जाऊन 20 फूट अंतरावर पडले, तर कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या दोन दुचाकी वाहनांना उडवत रस्त्याचे बॅरिकेट तोडून स्ट्रीट लाइटच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला व हाता-पायाला जबर दुखापत झाली. अपघातस्थळी लोकांनी धाव घेत जखमीला लागलीच रुग्णवाहिकेतून सेवाग्राम रुग्णालयात ‘पाठविले. अपघाताची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारचालकाला ताब्यात घेतले, पुढील तपास सेलू पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here