

वर्धा – जिल्ह्यात कोरनाचा उद्रेक दिवसेनदिवस वाढत चाललेला आहे. सोमवारी हिंगणघाट येथील एका ६३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे हिंगणघाट येथील रामनगर वार्डात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्मान झालेले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार वर्धा शहरात १० रुग्ण मिळाले आहे. ऐकट्या दयालनगरात सात रुग्ण आहेत. तर देवळी आणि पुलगाव येथे प्रत्येकी एक रुगण असल्याची नोंद झालेली आहे. हिगणघाट येथे पाच रुग्ण तर आर्वी तालुक्यात तीन पॉझिटीव्ह रुग्ण असल्याचे पुढे आलेले आहे. या व्यतिरीक्त २७६ व्यक्तींचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसुन त्याकडे अनेकांच्या नजरा लागुन आहे.