आवाजावरून राडा; पाच जणांनी व्यक्तीस बदडले

वर्धा : गाण्याचा आवाज कमी, करण्यावरून पाच जणांनी व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. देवळी येथील केदार ले-आऊट परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली.

ज्ञानेश्वर एकनाथ डबले याच्या घरी कार्यक्रम असल्याने जोरजोरात गाणे वाजवणे सुरू होते. दरम्यान गाण्याचा आवाज कमी कर, असे म्हणून अनिल पारिसे, गोविंदा पारिसे, शौलेश पारिसे, प्रज्वल पारिसे, राजू पारिसे, नारायण पारिसे यांनी ज्ञानेश्वरशी वाद करून त्याला लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्यांनी मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी ज्ञानेश्वरने देवळी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींना अटक केल्याची माहिती देवळी पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here