कारची कारला धडक! वाहनांचे नुकसान; दोन महिला व दोन पुरुष जखमी

वडनेर : नजीकच्या आजनसरा येथे भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी कारने गेलेल्या सिंधी रेल्वे येथील भाविक परतीचा प्रवास करीत असता भरधाव असलेल्या दुसऱ्या कारने धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघात होताच दोन्ही कारमधील नागरिकांचा वाद होत वादाचे हाणामारीत रुपांतरण झाले. यात दोन महिला व दोन पुरुष जखमी झाले.

या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. देवदर्शनासाठी गेलेले सिंदी रेल्वे येथील भाविक कारने परत येत असता भरधाव असलेल्या दुसऱ्या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाल्याने तू अचानक ब्रेक कसा मारला, या कारणावरून वाद करून स्कॉर्पिओमधील तिघांनी ओमनी कारमधील दोन महिला व दोन पुरुषांना मारहाण करून जखमी केले. बराच वेळ भररस्त्यावरच हा वाद सुरू राहिल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्कॉर्पिओ चालक व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here