दुचाकीच्या धडकेत चिमुकला जखमी

वर्धा : भरधाव दुचाकीच्या धडकेत पाचवर्षीय चिमुकला जखमी झाला . आर्वी नाका परिसरातील वडार झोपडपट्टी परिसरात हा अपघात झाला . सक्षम लष्कर हा पाच वर्षीय मुलगा घरासमोर खेळत असताना समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीचालकाने निष्काळजीपणे दुचाकी चालवून धडक दिली . यात सक्षमच्या डोक्याला तसेच डोळ्याला गंभीर मार लागला . याप्रकरणी दुचाकीचालक हनुमंत जाधव याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here