आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा नदित बुडून मृत्यू ! बोर नदीतील घटना

समुद्रपुर : आंघोळीसाठी नदिवर गेलेल्या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सेलू येथील बाजार ओळी जवळील बोर नदीत घटली. मृतकाचे अमर मनोहर पाटील (२५) वार्ड नं. १ सेलू असे नाव आहे.
मृतक हा नागपूर येथील रहिवासी असून मागील चार वर्षांपासून तो पत्निसह सेलू येथील वार्ड नं.१ मध्ये किरायाने राहात होता. मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्याच घराजवळुन बोरनदी वाहत असुन सध्या या नदीत बोरधरनाचे पाणी सोडले आहे. काल मृतक अमर हा दुपारी नदिवर आंघोळीसाठी गेला. काठावर कपडे, जोडे काढून नदित उतरला यावेळी तो दारू पिऊन असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे. नदीला असलेला पाण्याचा ओढ व खोल पाण्याचा अंदाज न आल्याने मृतक हा पाण्यात बुडाला गावातच असलेली त्याची मावशी वनिता धाबाडे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलिसांनी गोतेखोरामार्फत शोध घेतला मात्र मृतदेह हाती लागला नाही. रात्री अंधार झाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. आज सकाळ पासून पुन्हा नदित शोध घेतला असता दुपारी त्याचा मृतदेह हाती लागला असुन सेलू पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथे पाठविण्यात आला आहे.
पुढिल तपास ठाणेदार सुनील गाढे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु कौरती करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here