भरधाव ऑटो रिक्षा उलटली! चालकाचा जागीच मृत्यू

अल्लीपूर : भरधाव असलेली ऑटोरिक्षा अनियंत्रित होत उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी पवनी गावाजवळ घडली. प्रवीण तमजीरे (36, रा. मदनी) असे मृताचे नाव असल्याचे सांगण्यात आले. मदनी येथील प्रवीण तमगीरे हा एमएच 32 ए. 4941 क्रमांकाच्या ऑटो रिक्षाने कुजई येथून लग्नाचे पाहुणे घेऊन सोनेगावला गेला होता. प्रवाशांना सोडल्यानंतर प्रवीण हा परतीचा प्रवास करीत असताना भरधाव ऑटो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उतरत उलटली, यात प्रवीण तमगीरे याचा जागीच मृत्यू झाला, अपघाताची माहिती मिळताच अल्लीपूर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक स्वप्नील भोजगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here