पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना! मार्चपर्यंत मिळणार मोफत धान्य

वर्धा : गरीब कल्याण अन्नदान योजनेला यापूर्वीच केंद्र सरकारने मुदतवाढ दिल्याने 31 मार्चपर्यंतच रास्तभाव दुकानातून न मोफत धान्य वितरण होणार या योजनेतंर्गत गरिबांना मोफत रेशनचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनाकाळात सुरू झालेली ही योजना मार्चपर्यंत सुरू रहाणार आहे. कोरोनाकाळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत गरीबांना पाच किलो गहू तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. ही योजना गेल्या 15 महिन्यापासून सुरू आहे. केंद्र सरकारने या योजनेला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

डिसेंबर 2021 पासून मार्च 2022 पर्यंतच्या महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. कोरोना संक्रमणामुळे रोजगार, छोटया व्यवसायाला मोठा फटका बसला होता. या निर्णयामुळे गरीबांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गरीब कुटुंबाला केंद्र सरकारकडून गेल्यावर्षी कोरोनाच्या काळापासून मोफत रेशन दिले जात होते. जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल ते जून 2020 पर्यंत होती. त्यानंतर ती नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती. तर नंतर मुदतीत वाढ करून 31 मार्चपर्यंतया योजनेचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here