आप कडून वीज दरवाढीचा विरोध! तहसीलदारांना दिले निवेदन

पुलगाव : पुलगाव येथे वीज दरवाढीच्या विरोधात बुधवार 13 जुलै रोजी, आम आदमी पार्टीच्यावतीने विरोध करण्यात आला. यावेळी पुलगाव शहर अध्यक्ष हकीम बोहरा, हर्षल सहारे, मनोहर वाळके, सौरभ श्रीराव, अन्य कार्यकर्ते यांनी पुलगाव येथील बसस्टॉप चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या या महाराष्ट्रातील युती सरकारने आल्या आल्या, जनतेला दिलेला 20 टक्के विजदर वाढीचा झटका हा जनसामान्यांचे आर्थिक बजेट कोळमडून टाकणारा असल्याने पुळगाव येथे आम आदमी पार्टी पुलगाव शहराच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पुलगाव येथील नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here