पांधन रस्ते घेणार मोकळा श्वास! लोकसहभागातून पवनार येथे पांदनरस्त्याच्या कामाचा शुभारंभ

वर्धा : वर्धा तालुक्यातील मौजा पवनार ते केदारवाडी पांदनरस्त्याची दुरूस्ती करण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ आज भुमिपूजन करून करण्यात आला. यावेळी तहसिलदार तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांदनरस्त्यांवरील अतिक्रमण व मोठ्या प्रमाणावर झाडे वाढल्याने सामान्य शेतकऱ्यांना रस्त्यांवरून वहिवाट करतांना फार अडचणीचे होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतांमध्ये येणे जाणे सुध्दा त्रासदायक ठरते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पांदन रस्त्यांची मागणी झाल्यानंतर पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यात पांदन रस्ते मोकळे करण्याच्या कामाचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे ठिकठिकाणी पांदन रस्त्यांची कामे करण्यात येत आहे.

तालुक्यातील पवनार ते केदारवाडी हा पांदन रस्ता मोकळा करण्यात येणार असून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तहसिलदार रमेश कोळपे यांच्याहस्ते भुमिपूजन करून करण्यात आला. यावेळी सरपंच शालीनी आदमने, उपसरपंच राहुल पाटणकर, निळकंठ हिवरे, मंडळ अधिकारी सुरेश देशमुख, आशिष सहारे, यशवंत लडके, मंगेश ठमके, विठ्ठल बांगडे, बाबाराव बांगडे, दामोदर हिवरे, सचिन उघडे, सुरज वैद्य, राजेंद्र हिवरे, सुरेश हिवरे, रंजना आंबटकर, गणपत हिंगे, निलेश बांगडे, अरूण वाघमारे, रविंद्र हिवरे, अनिल आंबटकर, संदिप राऊत, दिनेश उराडे, मुकुल जोग, अतुल आंबटकर, रवी आंबटकर आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here