रस्ता ओलांडनार्या वृद्धास अज्ञात वाहनाने चिरडले! सावंगी पोलिसात गुन्हा दाखल

वर्धा : रस्त्याने जात असलेल्या सुखदेव नाखले (70 ) रा. सालोड हिरापूर पुनर्वसन नेरी या वृद्धास अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना आज मंगळवार 23 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वर्धा यवतमाळ महामार्गावर पुनर्वसन नेरी परिसरात घडली. याप्रकरणी सावंगी पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुखदेव नाखले हे बकर्‍या चराईसाठी घेऊन गेले होते. बकर्‍या घेऊन रस्ता ओलांडत असताना अज्ञात ट्रक चालकाने चिरडल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडताच ट्रकचालकाने स्थळावरुन पळ काढला. अपघात ऐवढा भीषण होता की, अर्ध शरीराचा पुर्णतः चेंदामेंदा झाला होता. सावंगी पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here