विद्युत प्रवाहाच्या झटक्याने युवकाचा मृत्यू

समुद्रपूर : घराचे बांधकाम सुरू असतांना पाणी मारण्यासाठी विद्युत बल्ब लावत असताना जोरदार झटका बसला. यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सावंगी (वडगाव) येथे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. आकाश दिलीप राऊत (२४) रा.सावंगी (वडगाव) असे मृत युवकाचे नाव आहेत, आकाशच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर पाणी मारत असतांना अंधार पडत होता. त्यामुळे तो बल्ब लावण्याकरिता वर चढला असता विजेचा झटका लागला. त्याला त्वरीत समुद्रपूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉ.वरभे यांनी मृत घोषित केले. तो एका बँकेचे डेली कलेक्शन करून घर चालवायचा. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here