
वर्धा : काही कामानिमीत्य बहीनीकडे गेलेल्या शेतकर्याला रात्रीच्या आंधारात सर्पदंश झाल्याने त्याचा उपच्यारादरम्यान सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना आकोली येथी घडली. नारायण गुडधे असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
शेतकरी नारायण गुडधे शेती सोबतच स्कुल बस चालवायचे यामुळे ते आंजी (मोठी) येथे किरायाने मकान घेवून राहात होते ते काही कामानिमीत्य आपल्या बहिणीकडे सोंडी येथे दिनेश राऊत यांचे कडे गेले होते रात्रीच्यावेळी शौच्छालयात गेले असता विषारी सापाने त्यांच्या पायाला चावा घेतला त्याना उपचाराकरीता सेवाग्राम येथील कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचवर आंजी (मोठी) येथील मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

















































