कार शिरली हॉटेलमध्ये! तिघे जखमी

तळेगाव (श्या.पंत) : राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी टी-पाॅईटवरील एका बंद हॉटेल मध्ये अनियंत्रित झालेले भरधाव कार शिरली. यात दोघे व्यक्‍ती गंभीर तर एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला. हा अपघात रात्री ७ वाजताच्या सुमारास झाला.

नागपूरकडून अमरावतीकडे जात असलेल्या एम, एच. ०५ ए.जे. २०९० क्रपांकाची कार अनियंत्रित होत तळेगाव येथील आष्टी टी-पाॅईट परिसरातील एका बंद हॉटेलमध्ये शिरली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर जोराचा आवाज झाला होता. शिवाय होंटेलचे तसेच वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सतीश शिंदे (3४) रा. मुंबई, श्रीकांत मधुकर निघडे (3०) रा. पूणे अशी गभीर जखमींची नावे आहे तर शिशुपाल बिहारी रा, नोवागुडा, उडिसा असे किरकोळ जखमीचे नाव आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने कारंजा येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here