तालुक्यात गारपिटीमुळे पिके जमीनदस्त! तहसीलदार तलाठी कृषी सहाय्यक याना शेतकर्यांचा घेरावा; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी

आशिष वाघ

आष्टी (श ) : तालुक्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरणात होते शनिवार (ता. ८) दुपारी ४ वाजता दरम्यान अचानकपणे वादळी वार्यासह पाऊस व गारिने पिकांना झोडपुन काढले. यात तुर कापूस संत्रा मोसंबी चना भाजीपाला व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी शेतकर्यांनी तहसीलदार, तलाठी व कृषी सहाय्यक याना शेतकर्यांनी घेराव घालत नुकसान भरपाईची मागणी केली.

वादळी वारा पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अतिशय संकटात सापडला आहे. एकीकडे कोरोना तर एकीकडे शेतकरी संकटात आहे त्यात सद्यस्थिती पिके चांगले होते त्यामुळे शेतकरी समाधानी होते कापूसाला चांगला भाव असल्याने शेतकरी सुद्धा आनंदि होता परंतु गारपिटीमुळे शेतकरी सद्या हवालदिल झाला आहे.

त्यात रब्बी हंगाम पिके चांगले उत्पन्न मिळेल या आशेने शेतकरी तुर चना कापूस पिकांची लागवड केली परंतु सतत ढगाळ वातावरण असल्याने निरनिराळ्या रोगाच्या प्रादुर्भावाने पिकावर अधिक फवारणी करण्यात आली त्यात तालुक्यात ढगाळ वातावरण तर वादळी गारपिट पाऊस त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जमीन दोस्त झाले आहे.

तालुक्यातील खडकी सिरसोली, नरसापुर, टेकोडा, परसोडा, किन्हाळा व इतर गावासह वादळी वारासह गारपिटाने पिके जमिनदोस्त झाली आहे त्यातही गारा पडल्यामुळे शेतकर्यांचे गोढा व खडकी गावातील घरावर सुद्धा इलेक्ट्रॉनिक सर्विस वायर पडलल्याने भितिचे वातावरण खडकी येथील नागपुरे कुटुंबात झाले होते सिरसोलि येथील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here