भाजपविरोधात बोलणे पडले महागात! शेतकऱ्याच्या तोंडाला फासले काळे

वर्धा : भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींविरुद्ध बोलणे एका शेतकऱ्याला चांगलेच महाग पडले असून, भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क शेतकऱ्याला घेराव घालून त्याच्याच तोंडाला काळे फासले. ही घटना आरंभा शेतशिवारात घडली. याप्रकरणी शेतकरी प्रवीण महाजन याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली.

प्रवीण महाजन हा आरंभा परिसरात असलेल्या शेतशिवारात जनावरांना मलमपट्टी करीत होता. दरम्यान, अज्ञात व्यक्ती आली आणि तुम्ही प्रवीण महाजन आहे का, अशी विचारणा करून तेथून निघून गेला. काही वेळानंतर हिंगणघाट येथील भाजपचा कार्यकर्ता अंकुश ठाकूर आणि त्याचे काही सहकारी एका चारचाकी वाहनातून आले आणि प्रवीणला घेराव घातला आणि प्रवीणला तुम्ही गडकरी साहेबांना काळे फासणार होते असे म्हणून अंकुश ठाकूर याने कानशिलात लगावून हातातील काळ्या पावडरने तोंडाला काळे फासून भाजपच्या नेत्यांविरुद्ध बोलल्यास जिवे ठार मारेन, अशी धमकीही दिली. याप्रकरणी प्रवीण महाजन याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here