

गिरड : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली शिवारात विज पडून एका शेतकऱ्याचा मुत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
गुलाब उराडे वय ५२ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे तर विजेच्या प्रवाहात गंभीर जखमी झालेल्या विजय राऊत यांचा हिंगणघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास चिखली परीसरात विजांच्या कडकडाटासह पाऊसाला सुरूवात झाली. यावेळी शेतकरी गुलाब उराडे वय ५२ वर्ष व विजय राऊत हे शेतात काम करीत होते. शेतकरी गुलाब उराडे यांच्यावर विज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. तर विजय राऊत हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा तलाठ्यानी केला असून घटनेचा अहवाल उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांना पाठविला आहे. घटनेची नोंद गिरड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.