इंझाळा येथे 45 वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! परिसरात हळहळ

विजय गोपाल : देवळी तालुक्यातील इंझाळा या गावामध्ये 45 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २१) साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली विनोद किसन उरकुडे वय 45 वर्ष राहणार इंझाळा असे शेतकऱ्याचे नाव आहे.

विनोद जवळ दोन एकर शेती आहे गेल्या तीन वर्षापासून विनोद हा सततच्या नापिकीचा सामना करत होता संसाराचा गाडा कसा चालवावा हा विनोद पुढे प्रश्न असल्याने तो सतत चिंतेत राहायचा सकाळी दीपक उरकुडे हा शेतामध्ये फवारणीसाठी गेला असता त्याला मोहन हजारे यांच्या विहिरीवर चपला आणि दुपट्टा दिसला नंतर घरी विचारपूस केली असता विनोदच्या पत्नीने तो शेतात गेल्याचे सांगितले शेजाऱ्यांनी विहिरीवर जाऊन पाहिले असता विहिरीत विनोद चा मृतदेह आढळला.

या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव सामान्य रुग्णालयात पाठवला मृतक विनोद वर दोन ते अडीच लाख रुपयांचे नातेवाईकाचे कर्ज असल्याची माहिती मिळत आहे. मृतक शेतकरी विनोद उरकुडे याच्यामागे पत्नी नऊ वर्षाची मुलगी व चार वर्षाचा मुलगा असा आप्त परिवार आहे अशा होतकरू शेतकऱ्याच्या आत्महत्येने इंझाळा गावामध्ये शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here