भारतीय संविधान विचार जागर रथाचे वर्ध्यात स्वागत ; समविचारी संघटना सोबत बैढक ! जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

वर्धा : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान अभियानांतर्गत इलाईट सर्टिफिकेशन्स अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स नाशिक यांच्याकडून नुकतीच राज्यस्तरीय भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधान विचार जागर रथाचे शुक्रवारी दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी वर्ध्यातील विविध पुरोगामी संस्था संघटनांनी स्वागत केले.

त्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सर्व पुरोगामी संस्था संघटना समन्वय समिती, अश्वघोष सांस्कृतिक मंडळ, सिटू,आयटक, विद्रोही साहित्य मंडळ, सत्यशोधक समाज, बुद्ध टेकडी परिवार, जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्रसेवा दल आधी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.तर सायंकाळी समविचारी संस्था संघटना यांचे पदाधिकारी गजेंद्र सुरकार, प्रा विलास भगत, प्रकाश भोयर, अनिलजी मुरडीव, दिपक डेकाटे, मोहन खैरकार, गुड्ड देशमुख, आबासाहेब थोरात, स्वप्ना थोरात, भिमराव चव्हाण, दिपक अचलखांब, धम्माल इंगोले उपस्थित होते.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते दि 28 मार्चला तिरंगा ध्वज दाखवून उद्घाटन झालेल्या रथाचे जालना मार्गे नागपूरमध्ये माजी मंत्री व विद्यमान आमदार नितीन राऊत यांनी स्वागत केले. संविधानाच्या जनजागृतीसाठी निघालेला हा रथ वर्धा मध्ये आला. यावेळी उपस्थित इलाईटचे मॅनेजिंग डायरेक्टर आबासाहेब थोरात यांनी विचार जागर स्पर्धा परीक्षेबाबत बैढकित विस्तृत माहिती दिली. त्यामध्ये ही स्पर्धा परीक्षा राज्यस्तरीय असल्याचे त्यांनी सांगितले. ही स्पर्धा तीन गटांमध्ये होणार असून यामध्ये इयत्ता सातवी पासून ते अगदी वयोवृद्ध असलेल्या प्रत्येक नागरिकाला सहभागी होता येणार आहे. नागरिकांना सहभागासाठी www.ecisindia.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करायची आहे.

त्यानंतर नोंदणी केलेल्या प्रत्येक स्पर्धकाला घरपोच संविधानाची मोफत प्रत देण्यात येणार आहे. या संविधानाचा अभ्यास करून परीक्षेला सामोरे जायचे आहे. त्यातून तीनही गटानुसार प्रथम द्वितीय तृतीय अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक एक लाख रुपये असे बक्षीसांचे स्वरूप आहे. शिवाय उत्तेजनार्थ भरघोस बक्षीसही देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून संविधान घरोघरी पोहोचून प्रत्येक नागरिकाने ते अभ्यासावे आणि आपल्या देशाला अधिक प्रगत करण्यासाठी हातभार लावावा असा उद्देश असल्याचे थोरात यांनी सांगितले.

दरम्यान मार्गस्थ झालेला हा संविधान रथ सेवाग्राम परिसर, बस स्थानकावर आणि वर्धा शहरातील विविध भागात फिरला. यावेळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी तर आभारप्रदर्शन प्रा विलास भगत यांनी केले पुढे हि रथयात्रा पुलगाव मार्गे अमरावती जिल्हात जाणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here