

वर्धा : पोषण टँकर अँप्स हे इंग्रजी मध्ये असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करण्यास अडचण निर्माण होत आहे, एँप्स हे मराठीत करा आदी मागणी सिटू अंतर्गत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासोमर ठिय्या आंदोलन करून भारतीय श्रम परिषद आय. एल. सी. ४५ ते ४६ व्या अधिवेशनाच्या शिफारशीनुसार सेविका मदतनीस कामगार म्हणून मान्यता द्या. त्यांना प्राव्हीडट फड व कामगार विमा लागू करा. तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना पूर्णवेळ शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या. पोषण ट्रॅक्टर ॲप्स मराठी करा तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्याचे मानधन पोषण ट्रॅक्टरला जोडन्याचा निर्णय मागे घ्या. किरकोळ खर्चासाठी सादिल रक्कम वाढवून दरवर्षी ६ हजार रुपये द्या. टी एच. आर. बंद करा, अंगणवाडीत ताजा गरम आहार द्या, यासह आदी मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून केल्या आहे.
यावेळी अध्यक्ष अर्चना मोकाशी, सचिव रंजना सावरकर, गुफा कठाणे, अर्चना घुगरे, भैया देशकर, निर्मला चौधरी आरती दोडके, संगीता कोहळे, उषा मानकर, सविता जगताप आदीची उपस्थिती होती.