जिल्हाकचेरीसमोर करणार अनोखे आंदोलन! महापरीक्षा पोर्टलवर झालेल्या गैरप्रकार प्रकरणी जनहित याचिका दाखल करू

वर्धा : फडणवीस सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या महापरीक्षा पोर्टलवर अनेक गैरप्रकार झाले आहेत. त्यामुळे अनेक होतकरू व हुशार तरुणांवर अन्याय झाला असून, याप्रकरणी आपण स्वत: पुढाकार घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे प्रा. नीतेश कराळे यांनी आयोजित पत्रपरिषदेतून सांगितले.

कराळे पुढे म्हणाले, जिल्ह्यात सुमारे १० हजार, तर राज्यात लाखो तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत; पण मागील काही वर्षांपासून एमपीएससीच्या माध्यमातून हुशार तरुणांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने एमपीएससीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू केली पाहिजे. राज्यातील ठाकरे सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद केले आहे. शिवाय काही खासगी एजन्सींना परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली आहे; पण यापैकी दोन एजन्सींना उत्तर प्रदेश सरकारनेच बंदी घातली आहे; पण त्यांनाच परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात एमपीएससीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here