सेलू : रमणा फाटा जवळील पेट्रोल पंपावरील डिझेल टँकमधून चोरट्यांनी डिजेल चोरल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दिल्यानंतर सेलू पोलिसांनी तीन आरोपींसह मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शाहीरसिंग राठोड रा. भगीरथी फार्म रमना फाटा सेलू यांचे मालक भूपेश हेमंत जवादे यांच्या एचपी पेट्रोल पंपावरील डिझेल टँकमधून अंदाजे 1 हजार लिटर डिझेल स्कॉर्पिओतून चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीनंतर सेलू पोलिसांनी तपासचक्र फिरवत अनिस अजीस शेख (32) रा. विकास चौक सेलू, मयुर मसराम (28) रा. आमगाव, सागर डोंबरे (24) रा. विकास चौक सेलू या तिघांना अटक करून त्यांच्याजवळील मुद्देमाल डिझेल 1150 लिटर, एक स्कार्पिओ गाडी, सुमो गाडी, प्लास्टिक कॅन 48, इलेक्ट्रिक मोटर, प्लास्टिक पाईप असा एकूण 6 लाख 59 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Bhai Jo dikhta wo nahi rahta tu patrakar hai kuch bhi likh sakta yaha police hi chor hai ….