बस-दुचाकीच्या अपघात! विद्यार्थी जखमी

पुलगाव : पुलगाव-वर्धा मार्गावर कवठा शिवारात बस-दुचाकीचा अपघात झाला. यात हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी साहील काळपांडे हा जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास झाला. पुलगाव आगाराची एमएच ४० एक्यू ६१८४ क्रमांकाची बस वर्धेच्या दिशेने जात होती. बस मुरदगावकडे जाणाऱ्या वळण रस्त्याजवळ आली असता एमएच 3२ आर ५६०१ क्रमांकाची दुचाकी अनियंत्रित होत बस आणि दुचाकीत धडक झाली. यात दुचाकीवरील साहिल हा जखमी झाला. अपघात होताच बसचालक संजय कांबळे यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन थांबवून जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाय अपघाताची माहिती पुलगावचे बसस्थानक प्रमुख श्रेयस नांदुरणकर यांना दिली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here