युवकावर चाकू हल्ला! जीवे मारण्याची धमकी; पुलगाव पोलिसात तक्रार दाखल

पुलगाव : जुन्या वादाचा वचपा काढत युवकावर चाकूहल्ला करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आठवडी बाजार नागपूर फैल परिसरात २० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. समीर गणेश दाभाडे असे जखमीचे नाव आहे. समीर हा रस्त्याने जात असताना मानव रंगारी, सौरभ मेश्राम, आकाश ऊर्फ अक्क्या आणि एक युवक अशा चौघांनी रस्त्यात अडवून जुन्या वादातून शिवीगाळ केली.

समीरने शिवीगाळ करण्यास हटकले असता मानव रंगारीने चाकूने त्याच्या डाव्या हातावर मारहाण केली. तसेच इतर तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या अगदी क्षुल्लक कारणातून वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटनांचे रुपांतर पुढे गंभीर घटनेत होत असल्याने वेळीच सावध राहण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here