लॉकडाऊनमुळे राजेश राठोड यांची विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज भरताना धावपळ

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
काँग्रेस नेते राजेश राठोड यांची सोमवारी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना चांगलीच दमछाक झाली. राजेश राठोड हे जालन्याच्या उमरखेड येथील रहिवासी आहेत. शनिवारी काँग्रेसकडून त्यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यावेळी राजेश राठोड हे पुण्यात होते. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव सुरु केली. मात्र, त्यांनी कागदपत्रे ही जालन्यातील घरी होती.रविवारी ही कागदपत्रे पुण्यात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली.ही कागदपत्रे मिळाल्यानंतर राजेश राठोड यांनी रात्रीचा प्रवास करून मुंबई गाठली. मात्र, लॉकडाऊनमुळे आज सकाळपासून त्यांची चांगलीच धावपळ झाली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते. लॉकडाऊनमुळे राठोड यांना त्यासाठी सरकारी कार्यालयावर अवलंबून राहावे लागेल. आज सकाळी दहा वाजता सरकारी कार्यालये सुरु झाल्यानंतर प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले. त्यानंतर कागदपत्रांची खातरजमा करून नोटरी करण्यात पुन्हा तास-दीड तास गेला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी तीनपर्यंतची मुदत होती. त्यामुळे राठोड दीड वाजता विधानभवनात पोहोचले. अखेर दोन वाजण्याच्या सुमारास राठोड यांनी आपला अर्ज भरला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here