भरधाव टिप्परने महिलेस चिरडले! ऑटोतून पडली होती रस्त्यावर

वर्धा : ऑटोचालकाने दुचाकीला कट मारल्याने ऑटोत बसलेली महिला अचानक रस्त्यावर पडल्याने समोरुन भरधाव येणाऱ्या टिप्पर वाहनाचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने महिला काही दूर अंतरावर फरपटत गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रोठा शिवार परिसरातून गेलेल्या रस्त्यावर २० रोजी रात्रीच्या सुमारास झाला. नंदा मारोती मडावी रा. सालई पेवट असे मृतक महिलेचे नाव आहे.

मृतक नंदा मडावी ही त्यांच्या नातेवाडकांसोबत लग्न सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला एम. एच. ३२ ए. के. ०७२० क्रमांकाच्या ऑटोने वर्ध्याकडून वायफड येथे जात होती. दरम्यान रोठा शिवारात असलेल्या हनुमान मंदिराच्या अगदी काही दूर अंतरावर रस्त्याकडेला एक दुचाकी उभी होती. समोरुन एम.एच. ३४ एम. ८३७० क्रमांकाचा टिप्पर येत होता. ओंटो चालकाने भरधाव ओंटो चालवून रस्त्याकडेला असलेल्या दुचाकीला कट मारल्याने ऑटोचा तोल गेल्याने ऑटोत बसलेली नंदा ही रस्त्याच्या उजव्या बाजूला पडली. या दरम्यान समोरुन भरधाव येणाऱ्या टिप्परच्या चाकात ती आल्याने काही दूर अंतरावर ती फरपटत गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी सावंगी पोलिसांनी धाव घेत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here