वर्ध्यात साडेचार टन प्लास्टिक जप्त! व्यापाऱ्यांना ठोठावला 20 हजारांचा दंड

वर्धा : प्रतिबंधीत प्लास्टीक पिशव्या व इतर वस्तू विक्रीकरीता येत असल्याबाबत माहितीच्या आधारे 18 ऑक्टोंबरला रोहीत उधवानी यांच्या मालकीच्या माधवपुरा व भगतसिंह चौक, वर्धा या दुकानामधून 2.5 टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच राजेश बुधवानी, महादेवपुरा, वर्धा येथील दुकानामधून अंदाजे 2 टन याप्रमाणे एकूण साडेचार टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

दोन्ही व्यावसायिकांना 20 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने वर्धा येथील प्लास्टिकच्या ठोक व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात एकल वापर प्लास्टिक बंदी 1 जुलै 2022 पासून लागू असूनसुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री व साठवणूक होत असल्याने केन्द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशान्वये पथक गठीत करण्यात आले आहे. ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस विभागाचा समावेश करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here