बिनविषारी ‘मांडूळ’ हा तर शेतकऱ्यांचा मित्र! ना पैशांचा पाऊस, ना गुप्तधनाचा शोध; ‘एरिक्स जॉनाय’ हे शास्त्रीय नाव : समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेमुळे होते तस्करी

वर्धा : एरिक्स जॉनाय असे शास्त्रीय नाव असलेल्या तथा दुतोंड्या साप असे सर्वपरिचित असलेला मांडूळ हा बिनविषारी साप आहे. पण, या सापामुळे गुप्तधन शोधता येते, अशी अंधश्रद्धा समाजात कायम असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे वास्तव आहे.

शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या मांडूळ सापाचा समावेश सरीसृपवर्गाच्या बोइडी कुलातील एरिक्स उपकुलात केला जातो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तो आढळत असला तरी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेमुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.वन्यजीव सप्ताहाच्या औचित्याने वर्धा जिल्ह्यात मांडूळ सापाचे संगोपन होण्याची गरज आहे. अजगरासारखा जाड दिसणारा मांडूळ सापाची जास्तीत जास्त लांबी दोन मीटर असते. अतिशय लाजाळू असलेला हा साप एकाएकी मनुष्यावर हल्ला करीत नाही.

मांडूळ दोन नव्हे एकाच तोंडाचे…

शरीराच्या वरच्या भागाचा रंग गर्द तपकिरी किंवा काळा असतो. पाठीवर पिवळसर रंगाचे ठिपके किंवा पट्टे असतात. काही मांडुळांवर ठिपके नसतात. या सापाची शेपटी बोथट, जाड व आखुड असते. मांडुळाची शेपटी डोके प्रथपदर्शनी सारखेच दिसतात, त्यामुळे हा साप दोन तोंड्या असल्याचे भासते. पण हे वास्तव नाही.

मांडुळ तस्करी हा गुन्हा

मांडूळ सापाविषयी समाजात अनेक गॅर्समज असल्याने त्यांची अकारण हत्या केली जाते. शिवाय, तस्करीही केली जाते. त्यामुळे त्यांची संरव्या कमी होत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार मांडुळ सापाला संरक्षण देण्यात आले असत पांडूळची तस्करी हा गुन्हा आहे.

३० हून अधिक व्यक्तींवर कारवाई

मागील पाच वर्षांचा विचार केल्यास वनविभागाच्या वतीने वेळोवेळी कडक कारवार्ड करून मांडुळा सापाची तस्करी करणाऱ्या ३० हून अधिक व्यवत्तींना अटक करण्यात आली आहे. वर्धा येथील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या घडक कारवार्डमुळे तस्करांचे घाबेच दणाणले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here