वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार! बकऱ्यांसाठी चारा आणण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; दूरपर्यंत नेले फरफटत

कारंजा (घाडगे) : शेतात बकऱ्यांसाठी चारा आणण्यास गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज बुधवार (ता. ९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास कारंजा घाडगे तालुक्यातील कन्नमवार ग्राम येथे घडली. लक्ष्मण महादेव हुके (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हा शेतकरी बकऱ्यांकरिता चारा आणण्यासाठी गावानजीकच्या तलाव रस्त्यावर असलेल्या शेतात गेला होता. शेतामधील गव्हाच्या पिकात असलेला हिरवा चारा कापत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला व त्याला दूरपर्यंत ओढत नेले. यावेळी शेतकऱ्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावले असता वाघ पळून गेला. परंतु तोपर्यंत लक्ष्मणचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here