
पुलगाव : पुलगाव येथील धनराज नथुजी रामटेके रा. बरांडा कॉलनी याच्या घरातून पुलगाव पोलिसांनी तीन किलो गांजा (किंमत 30 हजार 560 रुपये) जप्त केला आहे. ठाणेदार शेळके यांच्या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पोलिस उपविभागीय अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शेळके, पोलिस उपनिरीक्षक दहीलकर, पोलिस कर्मचारी राजेंद्र हडके, खुशलपंथ राठोड, पंकज टाकोने, महादेव सानप, शरद सानप, प्रदीप शहागाटे, मुकेश वांदिले, जयदीप राठोड, पंधरे, सोनी यांनी केली.