

वर्धा : आष्टी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारून तब्बल २१ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून १८ हजार रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण २५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी अटक केलेल्यांत संतोष किसन पोकळे, जीवन श्रीकृष्ण कडू, संजय देवीदास पोहाणे, सतीश रामराव निचत, विक्की रामभाऊ मोरे, नितीन मुकिंद सत्पाळ, संजय महादेव दारोकार, विलास यादव कावनपुरे, प्रशांत ज्ञानेश्वर मळगे, आशिष पंजाब ठाकरे, विनोद अंबादास सुरपाम, सुरेंद्र यादव मडावी, मनोज साहेब सव्वालाखे, वासुदेव सदाशिव वैद्य, संदीप सुखदेव कुंभरे, सुरेश गुलाब पोहाणे, रवी शंकर बासकवरे, मयूर जिंदाल गुप्ता, बबलू प्रभाकर वरुडकर, सागर रंगराव शेंद्रे, सुभाष गुलाब पोहाणे यांचा समावेश असून त्यांना जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.