चाकूने वार करीत जावयाने केले साळ्याला जखमी! पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : पत्नीस शिवीगाळ करण्यास हटकले असता जावयाने साळ्याच्या गळ्यावर व पायावर चाकूने वार करीत जखमी केले. सिंदी मेघे येथे ही घटना घडली.

गजानन वालदे हा कुटुंबासह घरी असताना शेजारी राहणारा जावई चंद्रशेखर नाग हा घरी आला त्याने गजाननच्या पत्नीशी वाद करुन शिवीगाळ केली. दरम्यान गजाननने पत्नीला शिवीगाळ करण्यास हटकले असता चंद्रशेखर नाग याने मानेवर तसेच पायावर चाकूने वार करीत त्यास जखमी केले. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here