ऑटो पलटला! आठ प्रवासी जखमी; गुन्हा दाखल

वर्धा : प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोला अपघात झाल्याने ओंटोतील सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात वेळा शिवारात झाला असून, ऑटोचालकाविरुद्ध हिगणघाट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकृष्ण मधुकर दुधनकर (रा.हिंगणघाट) याने त्याच्या ताब्यातील एम, एच, 3२ बी.८६०४ क्रमांकाचा ओटो भरधाव चालविल्याने लगतच्या बैलबंडीचे जुवाडे ऑटोमध्ये अडकल्याने ऑटो रस्त्यावर पलटला. यात ऑटोतील सात प्रवासी जखमी झाले. जखमीचे नावे कळू शकली नाहीत. याप्रकरणी ऑटोचालक श्रीकृष्ण दुधनकर याच्याविरुद्ध हिंगणघाट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here