खड्ड्यात कोसळून दुचाकीस्वार ठार! सेलू शहरालगतच्या वळण रस्त्यावरील अपघात

वर्धा : भरधाव दुचाकी रस्त्याशेजारील जाहिरात फलकावर आदळून खड्यात कोसळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना सोमवार 3 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 5.45 वाजताच्या सुमारास सेलू शहराच्या बाह्य वळण मार्गावर घडली. हर्षल सुरेशराव भांडारकर (वय 25) र. गणेशनगर, बोरगांव (मेघे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मृतक हर्षल हा एम. एच.32 1695 क्रमांकाच्या दुचाकीने नागपूरकडून वर्ध्याच्या दिशेने भरधाव जात होता. दरम्यान, सेलू शहराच्या बाह्य मार्गावरुन जात असताना अचानक त्याची दुचाकी रस्त्याशेजारी असलेल्या जाहिरात फलकावर आदळली. जाहिरात फलकाला धडक दिल्यानंतर ती थेट लगतच्या पाणी भरलेल्या डोबर्यात जाऊन पडला. ही घटना माऊली पार्क भाग-तीनच्या प्रवेशद्वारासमोर घडली. सदर अपघातात हर्षलच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच सेलू पोलिस स्टेशनचे देवराव येनकर व अमोल राऊत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रवाना केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here