
हिंगणघाट : जिनिंग परिसरात असलेल्या मैदानात झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात माँ भवानी जिनिंग अँड प्रेसिंग परिसरात झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध १० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हुकुमुरान भिल (४५, रा. भोजाकोर, जि. जोधपूर, राज्य राजस्थान) असे मृतकाचे नाव आहे.
हुकुमुरान हा १० रोजी दुपारच्या सुमारास माँ भवानी जिनिंग अँड प्रेसिंग परिसरात असलेल्या मैदानात झोपून होता. दरम्यान, पीबी. १० एचएस. ९१९१ क्रमांकाच्या ट्रकचालकाने आजूबाजुला न पाहता हयगयीने व निष्काळजीपणे ट्रक मागे घेऊन झोपून असलेल्या हुकुमुरानच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक नेले. यात हुकुमुरान याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मणकुमार जियाराम भिल याने पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.




















































