सोयाबीन पिकांचा पंचनामा करुन आर्थिक मदत द्या! जनता दरबारची मागणी; तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन


मोहन सुरकार

सिंदी(रेल्वे) : शहर परिसरातील तसेच लगतच्या शेतीतील सोयाबीनच्या पिकावर करपा व खोडकिडीचा प्रादुर्भावने शेतातील सोयाबीनचे संपूर्ण पीक नष्ट झाले आहे. त्याचा पंचनामा करुन तात्काळ एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत शासनाने शेतकर्यांना दयावी अशी मागणी जनता दरबार संघटनेच्या वतिने तहसीलदार सेलू मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
देशात कोरोना रोगाचा वाढता प्रदूर्भाव रोखण्यासाठी शासनाने एकीकडे लॉक डाऊन केल्याने अगोदरच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते, त्यात कसातरी सावरत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठया प्रमाणात नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड केली परंतू लागवडीनंतर बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतात सोयोबिन बीयाने उगवलेच नसल्याने मोड करत दुबार तीबार पेरणी करावी लागली नंतर कसेबसे सोयाबीन उगवले तर अतिवृष्टीमुळे सोयाबीन खराब झाले यातूनही वाचत काहीतरी पीक सोयाबीनचे शेतकऱ्याचा हातात येण्या अगोदरच सोयाबीन पिकावरती कोरपा व खोडकीड, एलो मौजा नावाच्या रोगाचा मोठ्याप्रमाणात आक्रमण झाल्याने सोयाबीन झाडाचे खोड व लागलेल्या शेंगा या अळीने खाऊन उध्वस्त केल्याने शेतातील सोयाबीनचे उभे पीक अचानक वाळुन, संपुर्ण पीक नष्ट झाले असून यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत मिळावी याकरीता जनता दरबार संघटनेचेच्या वतीने जिल्ह्याचे आमदार खासदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना संघटनेचे अध्यक्ष गिरीश इटनकर, कोषाध्यक्ष राजु कोपरकर, सचिव रामेश्वर घंगरे, राजू दांडेकर, गणेश सोनटक्के, श्री वैद्य, रामभाऊ सोनटक्के, आदीनी तसेच जनता दरबार संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here