भाकरा नाल्याच्या पुरात वाहून गेला तरुण! पिंपळगाव येथील घटना

हिंगणघाट : तालुक्‍यातील पिंपळगाव परिसरातील भाकरा नाल्याच्या पुरात २५ वर्षीय तरुण वाहून गेला. ही घटना निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. वाहून गेलेल्या तरुणाच्या शोध घेणे सुरू आहे. जिल्ह्यातील विविध भागात मध्यरात्रीपासूनच थांबून थांबून पाऊस होत आहे. अशातच पिंपळगाव येथील रहिवासी असलेला अमोल रवींद्र लिहीतकर (२५) हा सकाळी ९३० वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडला.

भाकरा नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असतानाही त्याने दुचाकीसह नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. अशातच तोल गेल्याने तो पाण्यात पडला. शिवाय पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. ही. बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली; अमोल पोलिसांना सापडला नही. सध्या शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here