

गिरड : खुर्सापार बिटातील मौजा डोंगरगांव शेतशिवारात झुडपामध्ये तीन वर्ष वयोगटातील बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या बिबट्याचे शवविच्छेदन साहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार (तेंदू व वन्यजिव ) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तपासणी अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. प्राप्त माहितीनुसार 24 मार्चला सायंकाळी 6.30 वाजता खुर्सापार बिटातील डोंगरगाव शिवारात पाडुरंग डबाले यांच्या शेतात एक बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती साहाय्यक बनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा करत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला शनिवारी 25 मार्चला मोहगाव रोपवाटिकेत शविच्छेदन पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. योगेश राधोरते, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. स्मिता महे डॉ. सुशील पांङव यांनी केले. यावेळी बिबट्याच्या मृत्यदेह जंगल परिसरात दहन करण्यात आला. संपूर्ण प्रकिया उपवनसंरक्षक राकेश शेपट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाङण्यात आली.