

वर्धा : जिल्ह्यात गवंडी कामगारांकडून विविध योजनेतील लाभ देण्यासाठी कमिशन घेण्याचा धंदा सुरू आहे. आज मंगळवार (ता. ८) रोजी शासकीय कामगार अधिकारी पवन कुमार चव्हाण याला शिष्यवृत्तीचे पैसे मिळवून देण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात अटक केली.
गवंडी कामगारांच्या मुलाच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी चव्हाण यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, सम्बधित व्यक्तीला लाच द्यायची नसल्याने त्याने नागपूर येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. मंगळवार (ता. ८) रोजी सायंकाळी चालक पवन आंबाडे रा. नागपूर याच्या मार्फत लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या अधिकार्यांनी ३० हजाराची लाच घेताना चालकाला रंगेहात पकडले. ही लाच कामगार अधिकारी चव्हाण यांच्यासाठी घेतल्याचे स्पष्ट झाल्याने त्यानाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधिक्षक रश्मि नांदेडकर, अप्पर पोलिस अधिक्षक दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दिनेश लबडे, श्रीकांत गोतमारे, अशोक बैस, योगेद्र चौधरी, राजेश बन्सोड, नरेंद्र चौधरी, शालिनी जांभुळकर यांनी केली.