हिंगणघाटात १.९९ लाखांचे दागिने लंपास! अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : अज्ञात चोरट्याने घरात ठेवलेले पावणे दोन लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना विठ्ठल-रुक्मिणी मोहल्ला शीतलामाता मंदिर परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेबी रमेश बोरकर हिच्या घराचेकाम सुरू आहे. तिने काम पूर्ण झाल्यावर तिच्याकडे असलेला सोन्याचा गोफ, दोन अंगठ्या, मंगळसूत्र, चांदीच्या तोरड्या, तसेच ३ हजार ५०० रुपये रोख रक्‍कम तिने एका लहान स्टिलच्या डब्ब्यात ठेवले होते. तिने घराचे काम पूर्ण झाल्याने दागिन्यांची पाहणी केली असता ठेवलेल्या दागिन्यांपैकी मंगळसूत्र, सोन्याचे पदक असलेले, सोन्याचा गोफ, दोन अंगठ्या डब्ब्यात दिसून आल्या नाही. अज्ञाताने बेबी यांच्या घरात प्रवेश करून डब्यातील सुमारे १ लाख ९९ हजार ७५० रुपयांचे दागिने चोरून नेल्याच संशय आल्याने तिने याबाबतची तक्रार देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here