सिगारेट देण्यास नकार! दगडाने मारहाण; पोलिसात तक्रार दाखल

सिंदी (रेल्वे) : सिगारेट देण्यास नकार दिल्याने व्यक्तीस तिघांनी मारहाण करीत अनधिकृतपणे घरात प्रवेश करीत कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली. पळसगाव रस्त्यालगतच्या परिसरात ही घटना घडली.

सचिन दिवाकर पेठकर हा सिगारेट पित असताना परवेज पठाण याने सिगारेट मागितली. दरम्यान सचिनने एकच सिगारेट असल्याचे सांगितले असता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सचिन घराकडे जात असताना परवेज पठाण, राजू कुरेशी, शैबाज शेख हे आडवे दगडाने मारहाण केली. इतकेच नव्हे तर अनविकृतपणे घरात प्रवेश करीत कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी सिंदी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर सचिन पेठकर याने परवेज रहेमान पठाण याला रॉडने डोक्यावर मारहाण केल्याची तक्रार परवेजने पोलिसात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here