पेट्रोल पंपाजवळ कार उलटली! मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

सेलू : नागपूरकडून भरधाव येणाऱ्या कारचा समोरचा टायर फुटल्याने कार अनियंत्रित होऊन उलटली. ही घटना रविवारी 5 डिसेंबर रोजी वर्धा- नागपूर महामार्गावर गांधी पेट्रोलपंपाजवळ घडली. सुदैवाने येथे कोणालाही इजा झाली नाही.

एमएच 29 बीपी 8637 क्रमांकाची कार भरधाव नागपूर येथून यवतमाळकडे जात होती. दरम्यान, वर्धा- नागपूर मार्गावर गांधी पेट्रोलपंपजवळ कारचा समोरचा टायर फुटल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटले. कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. सुदैवाने कारमधील कोणालाही इजा झाली नाही. यात कारचे मोठे नुकसान झाले. कारमध्ये पती- पत्ली दोघे जण बसले होते. पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे घटनास्थळी दाखल झाले. तक्रार केली नसल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here