शेतकऱ्यांची घरे बुलडोजरने पाडण्याची दिली धमकी! राजकीय षडयंत्र; अधिकारीही नेत्यांच्या दावणीला, गावात उलट-सुलट चर्चेला उधाण

झडशी : मागील अनेक वर्षापासून राजकीय सुड उगारण्यासाठी सुरू असलेल्या प्रकरणात तालुक्‍यातील झडशी गावातील वाढीव गावठाणाच्या प्रकरणात गावातीलच काही पदाधिकाऱ्यांच्या कारस्थानाचे बळी गावकरी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. आणि आता तर चक्क बुलडोजरने घरे पाडण्याची धमकी दिल्याने वेगळाच वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

तालुक्‍यातील झडीशी गावातील सहा शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन अधिकारी व उप विभागीय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संपादित करण्याचे आदेश पारीत केले होते. तीन शेतकऱ्याच्या जमीन संपादित झाल्या असून त्यापैकी शोत सर्व्ह नं१, ४७ व ४८ ही शेतजमीन संपादित न झाल्याने माजी जि.प. सदस्याने तीन शेतकऱ्याच्या शेतजमीन संपादित करण्यासाठी महसूल विभागाकडे मागणी केली होती.

यावेळी तुमच्या जमिनी द्या, नाहीतर बुलडोजरने घर पाडू, असा इशारा देण्यात आल्याचा आरोप तीन शोतकऱ्यांनी केला आहे. तेव्हापासून एका शेतकरी अंथरुणावर खिळून पडला आहे. जी शेतजमीन विस्तरीत गावठाणासाठी संपादित करण्यात आली आहे, त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आधीच उपयोगात आणली आहे. परंतु अजूनही मोजणी करून शासन व प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here