माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अघीकार देणाऱ्या माहामानवास अभिवादन! पवनार येथे कँडल मार्चने वेधले लक्ष

पवनार : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पवनार येथे कँडल मार्च काढून महामाणव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. येथील पंचशील वार्ड येथील बुद्ध विहारातून या कॅंडल मारचला सुरवात रण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायांनी हातात मेनबत्ती प्रज्वलीत करीत संपुर्ण गावातून ‘बुद्धम् शरणम् गच्छमी, धम्मम शरणम् गच्छमी संघम शरणम् गच्छमी, अशी वंदना करीत हा मार्च निघाला.

येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळीतून प्रतिमा साकारण्यात आली होती. या प्रतिमेला मेनबत्ती प्रज्वलीत करीत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हारार्पण करीत हा मार्च बाजार चौक येथून मार्गक्रमन करीत बुद्ध विहार परिसरात असलेल्या तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येत आपल्या हातातील प्रज्वलीत मेनबत्त्या पुतळ्यासमोर लावण्यात आल्या. यावेळी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन कवाडे, जयंतराव गोमासे, विशाल नगराळे, सहादेव चाटे, अमोल थूल, रजत नगराळे, मंगला कुत्तरमारे, शकुंतला ताई नगराळे, निलेश ढोले, वासुदेव खोब्रागडे, सुधाकर नगराळे, गोविंद वानखेडे, मंगेश वानखेडे, शेखर लोखंडे, सोनु मुंगले, भुषण मुंगले, अशोक लोखंडे, अजय जाधव, गुड्डु मुंगले, शुभम पडघान, उमेश नगराळे, गौतम थूल, कार्तिक पडघान, जितेंद्र पवार, प्रदिप आमटे, स्वप्निल मुंगले, साजन खंडाळे, उज्वल बावणे, योगेश जाधव, बंटी नगराळे, विकास गायकवाड यांच्यासह मोठ्या संखेने आंबेडकरी अनुयायी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here