
वर्धा : शहरातील गोंड प्लॉट परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई शहर पोलिसांनी शनिवारी केली. कार्तिक विठ्ठलराव भोमले (वय १९, रा.जुनी वस्ती सेवाग्राम ) अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोंड प्लॉट परिसरात किरायाने राहणाऱ्या समीर शंकर गाढवे यांची दुचाकी (क्रमांक एमएच 3२ बी.ए ०२७३) गुरूवार, दि. ८ जानेवारी रोजी चोरी केली होती. या संदर्भात शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला. तपास सुरू असताना माहिती मिळाली की, सेवाग्राम येथील जुनी वस्तीमध्ये राहणारा कार्तिक भोमले याने दुचाकी चोरी केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत आरोपीकडून दुचाकी जप्त केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पीएसआय शरद गायकवाड, राजेश राठोड, राजेश डाळ, सुरज जाधव, अभिषेक मते आर्दीनी केली.



























































