Home ◼️ संपादकीय महिलेला घरात घुसून केली जबर मारहाण ! रोहणी येथील घटना : देवळी...

महिलेला घरात घुसून केली जबर मारहाण ! रोहणी येथील घटना : देवळी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर निर्माण होताहेत प्रश्‍नचिन्ह

वर्धा : रात्रीच्या सुमारास घरी एकटी असलेल्या ५० वर्षीय महिलेला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना दोन दिवसांपूर्वी देवळी तालुक्‍यातील रोहणी (वसू) येथे घडली असून यासंदर्भात पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने कार्यप्रणालीवर प्रश्‍न चिन्ह निर्माण होत आहे. रोहणी (वसू, येथील ५० वर्षीय महिला घरी एकटीच असल्याचे पाहून अज्ञाताने रात्रीला घराते शिरून जबर मारहाण केली.

तिने आरडाओरड केल्याच्या आवाज शेजाऱ्यांना ऐकू आला पण, रात्र असल्याने कुणीही बाहेर आले नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी हा प्रकार गावात कळल्यावर एकच खळबळ उडाली. यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्यावरही देवळी पोलिस २४ तासानंतर उशिराने गावात पोहोचले. त्यानी
आजुबाजुला विचारपूस करुन याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन लागलीच सोडून देण्यात आल्याचे गावकरी सांगतात. यासंदर्भात जमादारासह ठाणेदारांनाही विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांची नेमकी भूमिका काय, इतकी गोपनीयता कशासाठी, असा प्रश्‍नही आता गावकरी विचारायला लागले आहे.

मारहाण कशासाठी, नेमके प्रकरण काय?

घरी एकटी असलेल्या ५० वर्षीय महिलेला घरात शिरून जबर मारहाण करण्यात आली. पण, मारहाण करणारा कोण? याबाबत महितलेकडूनही कुणाचेच
नाव समोर आले नसल्याचे गावकऱयांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मारहाण झालेल्या महिलेवर कुणाचा दबाव तर नाही ना?, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. महिलेला मारहाण कशासाठी झाली, करणारा किंवा करणारी कोण? असे अनेक प्रश्‍न आता गावकरी उपस्थित करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!